महाविद्यालये, विद्यापीठांतून 'जंक फूड'ला बंदी 

पीटीआय
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली (पीटीआय) : विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्थांच्या परिसरात "जंक फूड' विक्रीस बंदी करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. तसे आदेश त्यांनी सर्व विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांना बुधवारी दिले. 

नवी दिल्ली (पीटीआय) : विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्थांच्या परिसरात "जंक फूड' विक्रीस बंदी करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. तसे आदेश त्यांनी सर्व विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांना बुधवारी दिले. 

"महाविद्यालयांमध्ये "जंक फूड'वर बंदी केल्याने आरोग्यदायी अन्नासाठी नवे मानक प्रस्थापित होईल. यामुळे विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल, त्यांचे शिकण्यात लक्ष लागेल व लठ्ठपणाचे प्रमाण कमी होईल. अतिवजनामुळे होणाऱ्या आजारांना दूर ठेवणे शक्‍य होईल,'' असे "यूजीसी'ने विद्यापीठांशी संवाद साधताना म्हटले आहे. उच्च शैक्षणिक संस्थांच्या परिसरात "जंक फूड'ची विक्री करण्यास मज्जाव करण्याचे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिल्यानंतर "यूजीसी'ने याबाबत परिपत्रक काढले. "यूजीसी'ने परिपत्रकात म्हटले आहे की, "जंक फूड'संबंधीच्या सूचनांचे कठोर पालन करणाची विनंती करण्यात येत आहे. युवा पिढीमध्ये जी असुरक्षित, हळवी समजली जाते याबद्दल जागृती करण्यात यावी. 

चरबीयुक्त तसेच मीठ व साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाण्याविषयी आणि शाळांमध्ये आरोग्यदायी पदार्थांविषयी जनजागृती करावी, असा अहवाल महिला व बाल कल्याण मंत्रालयाने दिल्याने "यूजीसी'ने हे पत्रक काढले आहे. 

'सीबीएसई'चे प्राधान्य 
केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांच्या कॅंटीनमधून "जंक फूड' हद्दपार करावेत, असे निर्देश यापूर्वी "सीबीएसई'ने दिले होते. विद्यार्थ्यांचे डबे तपासण्याची सूचनाही शाळांना केली होती. पोषक आहाराबद्दल मुलांमध्ये जागरूकता निर्माण करावी, त्यांची आरोग्य तपासणी वेळोवेळी करावी, असेही सांगण्यात आले होते. 

Web Title: Junk food ban from colleges, universities