वादग्रस्त न्यायाधीश कर्नान यांची राजकारणात उडी !

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

कर्नान यांचा पक्ष सत्तेत आला. तर कर्नान यांच्याकडून दरवर्षी नव्या पंतप्रधानांची निवड केली जाईल. जर आमचा पक्ष सत्तेत आल्यास आम्ही 2019-20 मध्ये मुस्लिम महिलेला पंतप्रधान बनविणार आहोत. 1921-22 मध्ये याबाबतची जागा मागासवर्गीय व्यक्तीला तर त्या पुढील वर्षी दुर्लक्षित घटकातील लोकांना संधी देणार आहेत.

कोलकाता : पाच महिन्यांच्या तुरुंगवासातून सुटका झाल्यानंतर निवृत्त न्यायाधीश सी. एस. कर्नान यांनी आपण नवा पक्ष स्थापना करणार असल्याची घोषणा केली. 'अँटी करप्शन डायनॅमिक पार्टी' असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव असणार आहे. 

याबाबत कर्नान यांनी सांगितले, की आम्ही नव्या पक्षाची स्थापना करणार असून, 'अँटी करप्शन डायनॅमिक पार्टी' असे त्याचे नाव असणार आहे. लोकसभा निवडणूक 2019 साठी पक्षाकडून 543 लोकसभेच्या जागांसाठी सर्व महिलांना उमेदवारी देण्यात येणार आहे. 'अँटी करप्शन डायनॅमिक पार्टी'चे संस्थापक अध्यक्ष म्हणून मी स्थापना केली. आमच्या पक्षामध्ये फक्त महिलांना उमेदवारी देण्यात येणार आहे. आमच्या पक्षाकडून फक्त वाराणसीमध्ये पुरुष उमेदवाराला निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी देण्यात येणार आहे. 

कर्नान यांचा पक्ष सत्तेत आला. तर कर्नान यांच्याकडून दरवर्षी नव्या पंतप्रधानांची निवड केली जाईल. जर आमचा पक्ष सत्तेत आल्यास आम्ही 2019-20 मध्ये मुस्लिम महिलेला पंतप्रधान बनविणार आहोत. 1921-22 मध्ये याबाबतची जागा मागासवर्गीय व्यक्तीला तर त्या पुढील वर्षी दुर्लक्षित घटकातील लोकांना संधी देणार आहेत.

Web Title: Justice C S Karnan launches political party