जे. एस. खेहर यांचा सरन्यायाधीशपदी शपथविधी

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

खेहर हे पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करत होते. सात महिन्यांचा कार्यकाळ त्यांच्याकडे असणार आहे.

नवी दिल्ली - न्यायाधीश जे. एस. खेहर यांनी आज (बुधवार) भारताचे 44 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना शपथ दिली. 

खेहर यांच्या सरन्यायाधीश बनविण्याच्या अधिसूचनेला आव्हान देताना दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली होती. त्यानंतर आज राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात खेहर यांना शपथ देण्यात आली. न्यायाधीश टी. एस. ठाकूर सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर खेहर यांनी 44 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. खेहर हे शीख समुदायातील पहिले सरन्यायाधीश आहेत.

खेहर हे पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करत होते. सात महिन्यांचा कार्यकाळ त्यांच्याकडे असणार आहे.

Web Title: Justice Jagdish Singh Khehar sworn in as 44th Chief Justice of India