न्या. लोया मृत्यूप्रकरणी विचार याचिका दाखल 

पीटीआय
मंगळवार, 22 मे 2018

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीची सुनावणी करणारे केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) विशेष न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर फेरविचारासाठी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली -  सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीची सुनावणी करणारे केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) विशेष न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर फेरविचारासाठी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. 

बॉंबे लॉयर्स असोसिएशनने ही फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. 19 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर फेरविचार व्हावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने लोया यांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची विनंती करणाऱ्या सर्व याचिका फेटाळल्या होत्या. 

आपल्या एका सहकाऱ्याच्या मुलीच्या विवाहासाठी नागपूरला गेलेल्या न्यायाधीश लोया यांचा 1 डिसेंबर 2014 रोजी मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यांच्या मृत्यूविषयी संशय घेत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. 

Web Title: Justice Loyola matter of death filed an appeal again