ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण

Jyotiraditya Scindia admitted to Delhi hospital with COVID 19 symptoms
Jyotiraditya Scindia admitted to Delhi hospital with COVID 19 symptoms

नवी दिल्ली : भाजपचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या मातोश्री माधवीराजे शिंदे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल केले आहे. ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या मोतोश्री यांच्यात कोरोनाची लक्षण दिसत असल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अशा प्रकारचे वृत्त हिंदी वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ज्योतिरादित्य शिंदे यांना चार दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांची आणि त्यांच्या मातोश्रींची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत होती, मात्र त्यांच्या मातोश्रींमध्ये कुठल्याही प्रकारची कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती, तरीही त्यांची टेस्ट पॉजिटिव्ह आली आहे.
----------
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कोरोना
----------
दिल्लीत पुन्हा संघर्ष; नायब राज्यपालांचा केजरीवालांना दणका
----------
केंद्र सरकारचा नवा उपक्रम; आता घरोघरी होणार तपासणी
----------
ज्योतिरादित्य शिंदे हे लॉकडाउनची घोषणा केल्यापासूनच दिल्लीत होते. ते आपल्या कुटुंबासोबत दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी राहत होते. परंतु चार दिवसांपूर्वी अचानक ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे,

दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांनी अलीकडेच काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता, त्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पडून त्याठिकाणी भाजपाचं सरकार आलं. शिंदे समर्थक काँग्रेस आमदारांनी राजीनामा देत भाजपत प्रवेश केल्यानं तत्कालीन काँग्रेस सरकार अल्पमतात आल्यानं कोसळलं. ज्या आमदारांनी राजीनामा दिला आहे त्याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. त्यापूर्वीच ज्योतिरादित्य शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com