रितेश म्हणतो, 'या' दोघांपैकीच एक असावा काँग्रेसअध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 August 2019

ज्योतिरादित्य शिंदे हे मध्यप्रदेशामधील काँग्रेसचे वजनदार नेते आहेत. ते पक्षाचे सरचिटणीसही आहेत. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्ष कोण हे आणखी ठरलं नाही. सध्या सोनिया गांधी यांना काँग्रेसचं हंगामी अध्यक्ष बनवण्यात आलं आहे.

मुंबई :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव देशमुख यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख याने कोण असावा काँग्रेस अध्यक्ष यावर आपले मत व्यक्त केले आहे. अभिनेता रितेश देशमुखच्या मते राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट किंवा मध्यप्रदेश काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना काँग्रेसचे अध्यक्ष असायला हवेत. 

ज्योतिरादित्य शिंदे हे मध्यप्रदेशामधील काँग्रेसचे वजनदार नेते आहेत. ते पक्षाचे सरचिटणीसही आहेत. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्ष कोण हे आणखी ठरलं नाही. सध्या सोनिया गांधी यांना काँग्रेसचं हंगामी अध्यक्ष बनवण्यात आलं आहे.

दरम्यान, सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे या दोघांपैकी एकाला काँग्रेसचं अध्यक्षपद देण्यात यावं, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनीही केली होती.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jyotiraditya Scindia or Sachin Pilot would make the most ideal choice For new president says Ritesh Deshmukh