ज्योतिरादित्य शिदेंनी ट्विटरवरून का हटविले काँग्रेसचे नाव?

वृत्तसंस्था
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कामकाजाबाबत नाराजीचे पत्र वारंवार ज्योतिरादित्य सरकारला देत होते. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यात आता ज्योतिरादित्य यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव हे पद काढून त्या ठिकाणी समाजसेवक व क्रिकेटप्रेमी असे लिहिले आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विटरवरून काँग्रेस पक्षाचे नाव व आपले पद हटविले आहे. त्यांनी असे केल्याने मध्य प्रदेशातील राजकारणात खळबळ उडाली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावरील नाराजीमुळे हे पाऊल उचलल्याचे समजते. 

भाजपवाल्यांनो सावधान! काँग्रेसचा चाणक्य येतोय...

Image may contain: 3 people, text

मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कामकाजाबाबत नाराजीचे पत्र वारंवार ज्योतिरादित्य सरकारला देत होते. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यात आता ज्योतिरादित्य यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव हे पद काढून त्या ठिकाणी समाजसेवक व क्रिकेटप्रेमी असे लिहिले आहे. ज्योतिरादित्य यांनी ऑक्टोबरमध्ये सरकारला तब्बल 4 पत्रे लिहिली होती. यात शेतकऱ्यांना मदत, पूरपरिस्थितीसीठी मदत, रस्त्यांची परिस्थिती अशा गोष्टींसाठी काम करण्याची मागणी केली होती. पण याकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले असे ज्योतिरादित्य यांचे म्हणणे होते.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

ट्विटरवरील आपले पद बदलल्याने काँग्रेस गटात चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी अचानकपणे असे का केले, याबाब कोणालाच काही कल्पना नसल्याचे म्हणले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jyotiraditya Scindia removes congress identity from his twitter