मंदसौर घटनेचा तपास योग्य दिशेने नाही- ज्योतिरादित्य

वृत्तसंस्था
शनिवार, 30 जून 2018

मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये 7 वर्षाच्या मुलीबर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा तपास योग्य दिशेने चालू नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला आहे. त्याचबरोबर, या घटनेची सीबीआई चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी मध्य प्रदेशमध्ये महिला सुरक्षित नसल्याचे सांगत त्यांनी शिवराज सिंह चौहान सरकारवर टीका केली.

भोपाळ - मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये 7 वर्षाच्या मुलीबर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा तपास योग्य दिशेने चालू नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला आहे. त्याचबरोबर, या घटनेची सीबीआई चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी मध्य प्रदेशमध्ये महिला सुरक्षित नसल्याचे सांगत त्यांनी शिवराज सिंह चौहान सरकारवर टीका केली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या घटनेचा ट्विट करुन निषेध केला आहे. एका 8 वर्षाच्या मुलीसोबत झालेली ही घटना निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ती मुलगी मृत्यूसोबत झुंज देत असून तिला न्याय मिळायला हवा. मुलींना वाचवण्यासाठी सर्व देशवासियांनी एकत्र येणे गरजेचे आहे, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
 

दरम्यान, या घटनेने पुर्ण देशाला हादरवून टाकले असून, दोषींना फाशी देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. या प्रकरणाला राजकीय वळण मिळत असून, हजारोंच्या संख्यने लोक या घटनेचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, चौकशीदरम्यान, आरोपी इरफानने (20) त्याच्यासोबत, मंदसौरमध्ये राहणारा आसिफही असल्याचे कबूल केले आहे. पिडित मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्या मुलींवर अत्याचार केल्यानंतर आरोपी मद्यसेवन करत होते, तर मुलीच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: Jyotiraditya Scindia Says On Mandsaur Rape Investigation Is Not Going In The Right Direction