घाई काय आहे? थोडं थांबा : ज्योतिरादित्य सिंधिया 

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

: 'थोडं थांबा! घाई काय आहे?' अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राजस्थानमधील बडे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केली. राजस्थानमध्ये काँग्रेसने वसुंधराराजे यांच्या भाजप सरकारला जोरदार धक्का देत सत्ता स्थापनेच्या जवळ मजल मारली. 

भोपाळ : 'थोडं थांबा! घाई काय आहे?' अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील बडे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केली. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने शिवराजसिंह चौहान यांच्या भाजप सरकारला जोरदार धक्का देत सत्ता स्थापनेच्या जवळ मजल मारली. 

राजस्थानमध्ये नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया आघाडीवर आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सिंधिया यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. सकाळी 10.30 पर्यंतच्या कौलांनुसार, मध्य प्रदेशमध्ये कुठल्याही पक्षाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल होताना दिसत नाही. येथील एकूण २३० जागांपैकी काँग्रेस ११६, तर भाजप १०२ जागांवर आघाडीवर आहे. 

सिंधिया यांना पत्रकारांनी संभाव्य मुख्यमंत्रीपदाबाबत विचारले. त्यावर ते म्हणाले, 'थोडे थांबा! अजून निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यानंतर काही भाष्य करता येईल. इतकी घाई काय आहे?'

Web Title: Jyotiraditya Scindia statement on Madhya Pradesh Assembly Elections