ज्योतिरादित्यांचा भाजप प्रवेश 'सही या गलत'? फैसला मायावतींच्या हाती

Jyotiraditya Scindias decision to join BJP right or wrong depends on Mayawati?
Jyotiraditya Scindias decision to join BJP right or wrong depends on Mayawati?

नवी दिल्ली : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे सिंधिया (jyotiraditya scindia) यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यांचा हा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय 'सही या गलत' या गोष्टीचा निर्णय आता बहुजन समाज पक्षाच्या (BSP) सुप्रिमो मायावती (Mayawati) यांच्या हातात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने (Congress) सत्ता गमावली असली तरी हार मानलेली नाही. माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Ex CM KamalNath) यांनी भाजपला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, कमलनाथ यांना भाजपला धडा शिकविण्याची संधीही चालून आली आहे. कमलनाथ यांनी मध्यप्रदेशमध्ये सॉफ्ट हिंदुत्वाचा (Soft Hindutva) अजेंडा धारण केला असून त्यांचे लक्ष हे राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकींवर (By Election In MP) आहे. राज्यात विधानसभेच्या २७ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसला या निवडणुकीत किमान १० ते १२ जागांवर विजय मिळविणे अपेक्षित आहे. पोटनिवडणुक होणाऱ्या २७ जागांपैकी २२ जागा अशा आहेत की, ज्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत भाजपमध्ये सामील झालेल्या आमदारांमुळे खाली झालेल्या आहेत. त्यामुळेच मध्यप्रदेशमधील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार कोसळले होते. 

कमलनाथ आणि कांग्रेसजवळ राज्यात आता हारण्यासारखे काही नाही. परंतु, आगामी पोटनिवडणुकीत काँग्रेसने १० ते १२ जागांवर विजय मिळविला तर काँग्रेस अशा स्थितीत येऊ शकते की तेही भाजपसोबत सत्ताबदलचा खेळ खेळू शकतील, ज्या पद्धतीने भाजपने काँग्रेससोबत खेळ खेळला होता. परंतु, पोटनिवडणुकीत सर्वात मोठे आव्हान हे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासमोर आहे. पोटनिवडणुकीच्या निकालांवर हे समजणार आहे की ज्योतिरादित्य यांचा भाजपप्रवेश लोकांना कितपत रुचला आहे. 

जोतिरादित्य यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान हे २२ जागांवर विजय मिळविण्याचे आहे. समजा या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली तर ज्योतिरादित्य सिंधिया यांचे मोठ्या प्रमाणावर राजकीय नुकसान होईल. भाजपमधील त्यांची जागाही कमकुवत होईल. अशा परिस्थितीत त्यांच्या विजयाचा मार्ग बहुजन समाज पक्ष म्हणजे मायावती सुकर करु शकतात. मायावती या सध्या काँग्रेसवर नाराज असून मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीत एकूण २७ जागांवर उमेदवार देण्याची तयारी मायावती करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या २७ जागांपैकी काही जागांवर मायावती यांच्या पक्षाची ताकद आहे. त्यामुळे मायावती यांनी सर्व जागांवर उमेदवार दिल्यास याचा मोठ्या प्रमाणावर फटका हा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बसेल, असा प्राथमिक अंदाज आहे. कारण, मायावती यांचा सध्याचा कल लक्षात घेता मायावतींचा भाजपला सॉफ्ट कॉर्नर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया यांचा भाजप प्रवेश सही या गलत याचा फैसला मायावतींच्या हाती असल्याचे सध्या स्पष्ट दिसून येत आहे. मायावती आगामी पोटनिवडणुकीत कशा पद्धतीने उमेदवार देतात यावर सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मध्यप्रदेश विधानसभेमधील सद्याचे पक्षीय बलाबल
भारतीय जनता पक्ष (१०७)
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (८९)
बहुजन समाज पक्ष (२)
समाजवादी पक्ष (१)
अपक्ष (४)
रिक्त (२७)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com