'भाजपलाच साथ देणार'

वृत्तसंस्था
रविवार, 5 ऑगस्ट 2018

देशातील सर्व विरोधकांनी भाजप आणि नरेंद्र मोदींविरोधात महाआघाडी करण्याचे जवळपास निश्चित केले असताना, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपला 'साथ' देण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर के. चंद्रशेखर राव यांचा तेलंगण राष्ट्र समिती हा पक्ष भाजपला पाठिंबा देईल, असा शब्द चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला अाहे. 

हैदराबाद- देशातील सर्व विरोधकांनी भाजप आणि नरेंद्र मोदींविरोधात महाआघाडी करण्याचे जवळपास निश्चित केले असताना, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपला 'साथ' देण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर के. चंद्रशेखर राव यांचा तेलंगण राष्ट्र समिती हा पक्ष भाजपला पाठिंबा देईल, असा शब्द चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला अाहे. 

दिल्लीमध्ये शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि के. चंद्रशेखर राव यांच्यामध्ये एक बैठक झाली. या बैठकीमध्ये त्यांच्यात अनेक महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा झाली. यामध्ये महत्त्वाच्या असलेल्या 2019 लोकसभा निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाली. यामध्ये राव यांनी भाजपशी निवडणूकपूर्व आघाडी करणे आमच्यासाठी फायद्याचे नाही, मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आलं तर, आमचा पक्ष तुम्हाला पाठिंबा देईल, असं राव यांनी मोदींना आश्वासन दिले आहे.

दरम्यान, राव यांनी मोदींची घेतलेली ही दुसरी भेट आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे भाजपप्रणित आघाडीपासून वेगळे झाल्यापासून राव यांची भाजपशी जवळीक वाढत आहे. रावही भाजपसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: k chandrashekhar rao Meets Modi