मराठमोळ्या वातावरणात कर्नाटकातील कडोलीत ग्रंथदिंडी 

 मराठमोळ्या वातावरणात कर्नाटकातील कडोलीत ग्रंथदिंडी 

बेळगाव - संत महंत आणि विचारवंत आणि शिवकालीन वेषभूषा परिधान केलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी, मराठमोळे वातावरण आणि भजनाच्या गजरात निघालेली ३४ व्या कडाेली मराठी साहित्य  संमेलनाची ग्रंथदिंडी मिरवणूक लक्षवेधी ठरली.

प्रारंभी सकाळी साडे नऊ वाजता कडाेलीच्या वेशीतील श्रीराम साेसायटी येथून दिंडीला सुरुवात झाली. पालखी पूजन लक्ष्मण मारुती बुवा यांनी केले.  दिंडीत अग्रभागी भगवा ध्वज,  शिवरायांच्या वेशातील युवक, मावळे तसेच विविध वेशभूषेतील बालचमू व युवक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या दिंडीमध्ये कडाेली येथील शिवमुद्रा ढाेलताशा आणि ध्वजपथक व कडाेली येथील सरकारी प्राथमिक शाळेचे लेझिम पथक व टिपरी पथक सहभागी झाले होते. 

मराठी आपली संस्कृती, मराठी आपली अस्मिता आदी विषयावरील माहिती देणारे फलकही लक्षवेधी ठरले. सरस्वती हायस्कूल हंदिननूर येथील विद्याथ्यांनी शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सहभागी झाले हाेते. मराठमाेळ्या पेहरावात सहभागी झालेल्या मुली गावातील सर्वांचे लक्ष वेध घेत होत्या.

ग्रंथदिंडीत सहभागी झालेल्या भजनी पथकाने ज्ञानबा तुकारामांच्या जयघाेष करीत भक्तीमय वातावरण निर्माण केले होते. दिंडी मार्गावर भगव्या पताका आणि आकर्षक रांगाेळ्या काढण्यात आल्या हाेत्या. तसेच गल्लोगल्लीत भगव्या पताका व भगवे ध्वज लावण्यात आले होते.

दिंडी पेठ गल्ली, चंद्रशेखर आझाद गल्ली, अमराईतील सरकारी प्राथमिक शाळा, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित काेल्हापूर कडाेली येथील श्री शिवाजी हायस्कूल जवळील संमेलनस्थळी आली.

दिंडीत संमेलनाध्यक्ष प्रा. डाॅ. शेषराव माेहिते, उद्योजक टाेपाण्णा पाटील, बी. डी. माेहनगेकर, श्रीनिवास कालकुंद्रीकर, राजू मायाण्णाचे, राजन चौगुले, परशराम कडाेलकर, तानाजी पाटील, विनायक हाेनगेकर, तानाजी कुट्रे, विकास भाेसले, शंकर चिंचणगी, संभाजी हाेनगेकर, बाबु पाटील, सुधीर कुट्रे, बसवंत शहापूरकर, श्रीपती पाटील, शिवाजी पाटील, सुभाष कुट्रे, शिवाजी बाळेकुंद्री, माेहन पाटील, आनंद पवार, मराठी शाळा एसडीएमसी सदस्य, ग्रामस्थ उपस्थित हाेते.

कडोली साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण वाचण्यासाठी क्लि करा.... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com