'थोडक्याच मतांनी माझा पराभव झालाय, ती हार मी खिलाडी वृत्तीनं स्वीकारलीये' I Shrimant Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shrimant Patil

'जनतेचा कौल मला मान्य असून, पुढील काळातील होणाऱ्या इतर निवडणुकांत आपण सक्रिय होऊन समाजकार्य अविरतपणे सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Shrimant Patil : 'थोडक्याच मतांनी माझा पराभव झालाय, ती हार मी खिलाडी वृत्तीनं स्वीकारलीये'

शिरगुप्पी : विधानसभा निवडणुकीत कागवाड मतदारसंघातील (Kagwad Constituency) मतदारांनी सुमारे ७४ हजार मते देऊन मला पाठिंबा दिला, तरीही काही थोडक्यात मताने माझा पराभव झाला. पराभवाने खचून न जाता माझ्या मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते व मतदारांच्या नेहमीच मी पाठीशी असणार असल्याचे कागवाडचे माजी आमदार श्रीमंत पाटील (Shrimant Patil) सांगितले.

ते केंपवाड येथील कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. श्री. पाटील पुढे म्हणाले, ‘गेल्या वीस वर्षांच्या कालावधीत न झालेली विकासकामे माझ्या केवळ पाच वर्षांच्या कालावधीत झाली आहेत. कोट्यवधींचा निधी आणून विकासकामे राबविली आहेत. थोडक्या मतांनी माझा पराभव (Karnataka Assembly Election) झाला असला तरी तो पराभव मी खिलाडी वृत्तीने स्वीकारला आहे.'

'जनतेचा कौल मला मान्य असून, पुढील काळातील होणाऱ्या इतर निवडणुकांत आपण सक्रिय होऊन समाजकार्य अविरतपणे सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राजकारणात जय-पराजय असल्याने माझ्या कार्यकर्त्यांनी निराश न होता पुन्हा कामाला लागावे. माझे चाहते व कार्यकर्त्यांच्या कोणत्याही सुख व दुःखात यापूर्वीही मी सहभागी झालो आहे. पुढील काळातही मी त्यांच्या सदैव पाठीशी राहणार आहे.'

निवडणूक काळात महिना दीड महिने दिवस- रात्र राबलेल्या आमच्या पक्षाच्या कार्यकर्ते, मतदारांचे मी सदैव ऋणी असणार आहे. मतदारसंघातील मतदारांनी मला दिलेले प्रेम, आपुलकी ही ही माझ्या पूर्व जन्मातील ऋणानुबंध असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी कागवड तालुक्यातील भाजप कार्यकर्ते श्रीमंत पाटील यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.