सत्यार्थींच्या नोबेल पुरस्कार चोरीप्रकरणी तिघांना अटक

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : नोबेल पुरस्कारविजेते कैलाश सत्यार्थी यांच्या निवासस्थानावरून मंगळवारी चोरी झालेली नोबेल पुरस्काराची प्रतिकृती चोरीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी प्रतिकृतीसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

नवी दिल्ली : नोबेल पुरस्कारविजेते कैलाश सत्यार्थी यांच्या निवासस्थानावरून मंगळवारी चोरी झालेली नोबेल पुरस्काराची प्रतिकृती चोरीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी प्रतिकृतीसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

मंगळवारी सत्यार्थी हे त्यांच्या दिल्लीतील अलकनंदा येथील निवासस्थानी नसताना चोरी झाली होती. चोरट्यांनी नोबेल पुरस्काराची प्रतिकृतीसह रोकड आणि दागिने चोरून नेली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांचा तपास सुरू होता. दरम्यान, आज वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे पुरस्काराची प्रतिकृती आणि काही दागिनेही सापडले आहेत. सत्यार्थी यांनी त्यांचा नोबेल पुरस्कार देशाला समर्पित केल्यानंतर मूळ पुरस्कार राष्ट्रपती भवनामध्ये ठेवण्यात आला आहे. तर त्याची प्रतिकृती सत्यार्थी यांच्याकडे आहे.

'बचपन बचाओ आंदोलन'चे संस्थापक आणि बालहक्क आणि बालकांच्या शिक्षणासाठी काम करणारे कैलाश सत्यार्थी यांना 2014 साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Web Title: Kailash Satyarthi's Nobel Peace Prize replica recovered, 3 arrested