कैरानात भाजपला धक्का; आरएलडी आघाडीवर

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

ही आघाडी म्हणजे भाजपला मोठा धक्का असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी निराशाजनक बाब आहे. सुरवातीलाच तबस्सूम हसन यांनी 35 हजारहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे.  

कैराना (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील कैराना येथे होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणूकीत भारतीय जनता पक्षाला मागे टाकत अजितसिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलाच्या तबस्सूम हसन यांनी आघाडी मिळवली आहे. ही आघाडी म्हणजे भाजपला मोठा धक्का असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी निराशाजनक बाब आहे. सुरवातीलाच तबस्सूम हसन यांनी 35 हजारहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे.  

yogi adityanath

भाजपचे जेष्ठ नेते हुकूमसिंह यांच्या निधनाने येथे पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणूकीसाठी हुकूमसिंह यांची मुलगी मृगांका सिंह यांना उमेदवारी देण्यात आली होती, यांच्या विरोधात राष्ट्रीय लोकदलाकडून तबस्सूम हसन या उभ्या होत्या. हसन यांना काँग्रेस, समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षांचा पाठिंबा होता.  

मृगांका सिंह यांच्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी या भागात जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे या मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागल्यास ते भाजप व आदित्यनाथ यांच्यासाठी अपमानकारक असेल.

Web Title: kairana loksabha by poll elections rld on front shocking to bjp