उत्तर प्रदेशात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 28 मे 2018

कैरानापासून अवघ्या 30 किमी अंतरावर हे गाव आहे. ऊस उत्पादक शेतकरी उदयवीर यांच्यासह अऩ्य काही शेतकरी कारखान्याला दिलेल्या ऊसाची थकबाकी मिळण्यासाठी उपोषण सुरु केले होते. कोणाकडूनही दखल घेण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांचे उपोषण सुरु होते.

बागपत - उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बाराऊत गावात उपोषणाला बसलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या उपोषणादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज (सोमवार) मतदान होत असून, त्यापूर्वीच ही घटना घडली आहे.

कैरानापासून अवघ्या 30 किमी अंतरावर हे गाव आहे. ऊस उत्पादक शेतकरी उदयवीर यांच्यासह अऩ्य काही शेतकरी कारखान्याला दिलेल्या ऊसाची थकबाकी मिळण्यासाठी उपोषण सुरु केले होते. कोणाकडूनही दखल घेण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांचे उपोषण सुरु होते. अखेर पाच दिवसांच्या उपोषणानंतर उदयवीर यांचा उपोषणादरम्यानच मृत्यू झाला. यामुळे गावात संतापाचे वातावरण आहे.

शेतकरी नेते कृष्णा पाल तोमर यांनी सांगितले, की बाराऊत गावातील काही शेतकऱ्यांनी मिळून ऊसाची थकबाकी मिळण्यासाठी आंदोलन सुरु केले होते. सरकारकडूनही याची दखल घेण्यात आली नाही. अखेर उदयवीर यांचा उपोषणस्थळीच मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 13 हजार कोटींची थकबाकी कारखान्यांकडे शिल्लक आहे. सरकारकडून याबाबत कोणतेही पाऊल उचलले जात नाही. कैरानामध्ये सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी हा मोठा प्रश्न आहे. 

Web Title: Kairana By-Poll Sugarcane Farmer on Hunger Strike Dies