'पुल यांनी आत्महत्याच केली'

पीटीआय
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

इटानगर - परिस्थितीजन्य पुरावे आणि न्यायवैद्यक चाचणीचा अहवाल पाहता अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांनी आत्महत्या केल्याचा निष्कर्ष निघत असल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक एस. नित्यानंदन यांनी आज सांगितले. पुल यांच्या व्हिसेरा चाचणीचा अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून आला असून, त्यानुसारच हा निष्कर्ष निघत असल्याचे त्यांनी सांगितले. 9 ऑगस्टला कालिखो पुल हे गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले होते. सर्व पुरावे पाहता घातपात झाल्याची शक्‍यता नसली तरी हे पुरावे न्यायालयामध्ये सादर केले जाऊन त्यांचा निकाल हेच पुल यांच्या निधनामागील कारण समजले जाईल, असे नित्यानंदन यांनी स्पष्ट केले.

Web Title: kalikho pul has suicide