कलराज मिश्रा हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून आज नियुक्ती करण्यात आली. हिमाचलचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना गुजरात मध्ये हालवण्यात आले आहे.

नवी दिल्ली : ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून आज नियुक्ती करण्यात आली. हिमाचलचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना गुजरात मध्ये हालवण्यात आले आहे.

भाजपने नरेंद्र मोदी काळात मराठी पंच्याहत्तरीच्या वरच्या नेत्यांना तिकिटे न देण्याचे धोरण अवलंबले. कलराज मिश्रा हे पंच्याहत्तरीच्या पुढचे असल्याने त्यांनाही 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले. मात्र त्यांनी अन्य काही भाजपने त्याप्रमाणे यावर नाराजी व्यक्त न करता शांत राहणे पसंत केले सहाजिकच तिकीटे  कापलेल्यांपैकी राज्यपालपदी वर्णी लागणारे ते पहिले नेते ठरले आहेत.

मिश्रा यांनी 2014 ते 2019 या काळात मोदी सरकार मध्ये खादी ग्रामोद्योग असलेल्या मध्यम आणि लघु उद्योग मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला होता. गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे गुजरातच्या जबाबदारीतून मुक्तता करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalraj Mishra appointed as a new governor of Himachal Pradesh