कमल हसन यांचा पक्ष लोकसभा निवडणूक लढविणार

वृत्तसंस्था
शनिवार, 22 डिसेंबर 2018

तमिळनाडूचा विकास हेच आमचे एकमवे उद्दीष्ट आहे. समविचारी पक्षांशी आम्ही आघाडी करण्यासाठी तयार असू. मात्र, आताच सांगणे कठीण आहे की स्वतंत्र लढू की आघाडीमध्ये. आम्ही लोकसभा निवडणूक लढविणार असून, लवकरच समिती उमेदवारांची चाचपणी करणार आहे.

चेन्नई : अभिनेते कमल हसन यांचा पक्ष मक्कल निधी मय्यम (एमएनएम) हा आगामी 2019 लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तमिळनाडूच्या राजकारणात कमल हसन यांनी आपला पक्ष उतरणार असल्याचे सांगितले आहे. त्याची सुरवात ते लोकसभा निवडणुकीपासून करत आहेत. तमिळनाडूतील सत्ताधारी अण्णा द्रमुक आणि विरोधी द्रमुक पक्षाला पर्याय म्हणून कमल हसन यांच्या पक्षाकडे पाहिले जात आहे. रजनीकांत यांनीही नवा पक्ष केलेला आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात मोठा उलथापालथ पाहायला मिळणार आहे. 

कमल हसन म्हणाले, की तमिळनाडूचा विकास हेच आमचे एकमवे उद्दीष्ट आहे. समविचारी पक्षांशी आम्ही आघाडी करण्यासाठी तयार असू. मात्र, आताच सांगणे कठीण आहे की स्वतंत्र लढू की आघाडीमध्ये. आम्ही लोकसभा निवडणूक लढविणार असून, लवकरच समिती उमेदवारांची चाचपणी करणार आहे.

Web Title: Kamal Haasan To Contest 2019 Polls May Tie-Up With Like Minded Parties