अभिनेते कमल हसनचे ट्विटरवर ट्रोलिंग

पीटीआय
मंगळवार, 3 जुलै 2018

जातीविरुद्ध मत व्यक्त केल्याने अभिनेते कमल हसन यांना एका गटाने सोशल मीडियावर ट्रोल केले. यादरम्यान ट्रोल करणाऱ्या मंडळींनी त्यांची कन्या श्रुती हसन यांनी जातीविषयी केलेल्या विधानाची आठवण करून दिली आणि सुधारणा आपल्या घरापासून करण्याचा सल्लाही नेटिझन्सनी दिला. 

चेन्नई: जातीविरुद्ध मत व्यक्त केल्याने अभिनेते कमल हसन यांना एका गटाने सोशल मीडियावर ट्रोल केले. यादरम्यान ट्रोल करणाऱ्या मंडळींनी त्यांची कन्या श्रुती हसन यांनी जातीविषयी केलेल्या विधानाची आठवण करून दिली आणि सुधारणा आपल्या घरापासून करण्याचा सल्लाही नेटिझन्सनी दिला. 

कमल हसन यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर म्हटले होते की, आपण दोन्ही मुलींना शाळेत प्रवेश देताना अर्जावर जात आणि धर्माचा कॉलम भरण्यास नकार दिला होता. मात्र, केवळ या भूमिकेमुळे जातीचा मुद्दा संपणार आहे काय? असा प्रश्‍न काही नेटिझन्सनी कमल हसन यांना केला आहे. तसेच एका नेटिझन्सने काही वर्षांपूर्वी श्रुती हसन यांच्या मुलाखतीचा काही भाग अपलोड केला आहे. त्यात ती अय्यंगार असल्याचे म्हटले होते. शाळेच्या प्रवेश अर्जात आपण जातीचा उल्लेख केला नसला तरी आपली जात निर्मुलन चळवळ अपयशी ठरल्याचे नेटिझन्सने नमूद केले आहे. स्वत:च्या घरापासून सुधारणावादी चळवळ आपण सुरू करायला हवी. जातीचा उल्लेख न करणे हे समाधान आहे. मुलांना एवढे मोठे करा, की ते आपली जात विसरून जातील, असा सल्ला नेटिझन्सने दिला आहे.

Web Title: Kamal Haasan trolled on Twitter over stand against caste