Kangana Ranaut : मथुरेतून राखी सावंतही खासदार होईल; हेमा मालिनींचा कंगना रणौतला टोला

कंगना रणौत २०२४ साली निवडणूक लढवण्याच्या चर्चा आहेत.
Kangana Ranaut Hema Malini
Kangana Ranaut Hema MaliniSakal

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. इकडे भाजपा नेते अनेक राज्यांचे दौरे करत आहेत. तर विरोधी पक्षही एकत्र येऊन महागठबंधन करण्याच्या तयारीत आहेत. उत्तर प्रदेशही निवडणुकांसाठी सज्ज होताना दिसत आहे. या सगळ्यातच अभिनेत्री कंगना रणौतही निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावरुन भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी टोला लगावला आहे.

Kangana Ranaut Hema Malini
World Tourism Day :भारत काय कमी हाय व्हय ! परदेशातील वास्तुंवर पैसे घालवाताय

अभिनेत्री आणि भाजपा खासदार हेमा मालिनी काल मथुरा दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांना अभिनेत्री कंगना रणौत मथुरा मतदारसंघातून निवडणुकीला उभी राहणार असल्याविषयी विचारण्यात आलं. यंदा मथुरेतली भाजपाची उमेदवार कंगना रणौत असेल का याविषयी हेमा मालिनी यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या, "खूप चांगली गोष्ट आहे. माझा निर्णय देवावर अवलंबून आहे. जर दुसरं कोणी मथुरेतून खासदार होणार असेल, तर तुम्ही त्याला होऊ देणार नाही. तुम्हाला मथुरेतून फिल्मस्टारच हवा आहे. राखी सावंतला पाठवाल, तर तीही इकडून खासदार होईल."

Kangana Ranaut Hema Malini
Vinod Adani: गौतम अदानीचे बंधू सर्वांत श्रीमंत NRI; दिवसाला कमावतात 102 कोटी

कंगना रणौत २०२४ ची निवडणूक मथुरेतून लढवणार असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहे. गेल्या वर्षभरात कंगना दोनवेळा या भागात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ती आपल्या कुटुंबासोबतही वृंदावन इथं आली होती. तर दुसरीकडे हेमा मालिनी मथुरेतून भाजपाच्या तिकीटावर दोन वेळा निवडून आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com