शबरीमलात प्रवेश करणाऱ्या महिलेला सासूकडून बेदम मारहाण

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 जानेवारी 2019

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर दोन जानेवारीला पहाटे बिंदू आणि कनकदुर्गा या दोन महिलांनी शबरीमलामध्ये प्रवेश करुन भगवान अय्याप्पांचे दर्शन घेतले होते. त्यावरुन केरळमध्ये मोठा वाद आणि हिंसाचार झाला होता.

मल्लपुरम : नुकतेच शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या दोन महिलापैकी कनकदुर्गा या महिलेला तिच्या सासूने बेदम मारहाण केल्याचे समोर आले असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर दोन जानेवारीला पहाटे बिंदू आणि कनकदुर्गा या दोन महिलांनी शबरीमलामध्ये प्रवेश करुन भगवान अय्याप्पांचे दर्शन घेतले होते. त्यावरुन केरळमध्ये मोठा वाद आणि हिंसाचार झाला होता.

कनकदुर्गा मंगळवारी सकाळी पेरींतलमन्ना येथील तिच्या घरी परतली असता तिची सासू आणि तिच्यामध्ये शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यावरुन वाद झाला. यावरून सासुने तिला दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर तिला पेरिनाथमल्ला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या डोक्याला दुखापत झाली असून, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Kanakadurga, who entered Sabarimala, beaten up by mother-in-law