Loksabha 2019 : पाकला पाठविणारे व्हिसामंत्री निवडणुकीला घाबरून पळाले: कन्हैया कुमार

Loksabha 2019 : पाकला पाठविणारे व्हिसामंत्री निवडणुकीला घाबरून पळाले: कन्हैया कुमार

पटणा- अनेकांना जबरदस्तीने पाकिस्तानात पाठवणी करणारे पाकिस्तान टूर अँड ट्रॅव्हल्स विभागाचे व्हिसामंत्री नवादा येथून बेगुसरायला जावे लागल्याने दुखावले गेले आहेत, अशी टीका कन्हैया कुमार यांनी भाजपचे केंद्रिय मंत्री गिरीराज सिंह यांनी केली आहे. सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे गिरिराज सिंह हे नवादाऐवजी बेगुसराय येथून उमेदवारी देण्यात आल्याने पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत, म्हणूनच प्रतिस्पर्धी उमेदवार कन्हैया कुमार यांनी त्यांना टोला लगावला आहे. 

गिरिराज सिंह हे सध्या नवादा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. मात्र बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि लोकजनशक्ती पार्टी यांच्यात झालेल्या जागावाटपामध्ये ही जागा भाजपच्या मित्रपक्षांकडे गेली आहे. त्यामुळे गिरिराज सिंह यांचे नवादा येथील तिकीट कापून बेगुसराय येथे रवानगी करण्यात आल्याने गिरिराज सिंह हे नाराज आहेत. तिथे विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांच्याशी थेट आमना-सामना होणार असल्याने गिरिराज सिंह हे लढण्यास इच्छुक नसल्याची चर्चा आहे. 
 

बेगुसराय येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसलेल्या गिरिराज सिंह यांना कन्हैया कुमारने ट्विटरवरून टोला लगावला आहे. इतरांना पाकिस्तानात पाठवणारे पाकिस्तान टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे व्हीसा मंत्री नवादा येथून बेगुसराय येथे रवानगी झाल्याने दुखावले आहेत, असे कन्हैय्या कुमारने म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com