esakal | Kanhaiya Kumar: देशविरोधी नारे दिले असतील, तर अटक का नाही झाली?
sakal

बोलून बातमी शोधा

kanhaiya kumar

देशविरोधी नारे दिले असतील, तर अटक का झाली नाही - कन्हैया कुमार

sakal_logo
By
सुधीर काकडे

जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा सदस्य कन्हैयाने नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी देखील अनैपचारिकपणे काँग्रेस विचार धारा स्विकारली आहे. कन्हैया कुमारने प्रवेश काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जेएनयु विद्यापीठात कथित रित्या देशविरोधी नारे दिल्याचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. याप्रकरणी कन्हैया कुमारने (Kanhaiya Kumar) भाजपवर निशाणा साधला.

कन्हैया कुमारने काँग्रसमध्ये प्रवेश केल्यानंतर राहुल गांधी हे भापविरोधात लढणारे एकमेव नेते असल्याचे म्हटले आहे. तसेच दिल्लीतील जेएनयु विद्यापीठात देशविरोधी नारे दिल्याचा आरोप कन्हैया कुमारवर करण्यात आला होता. आता त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा जेएनयु विद्यापीठातील ते प्रकरण चर्चेत आले आहे. एनडीटीव्हीशी बोलताना त्याने या प्रकरणावर देखील स्पष्टीकरण दिले आहे. आरोप तर काहीही होऊ शकतात, मात्र जर आपण देशविरोधी नारे दिले असेल, तर आपल्याला आतपर्यंत अटक का होऊ शकली नाही असा सवाल कन्हैया कुमारने उपस्थित केला.

हेही वाचा: ...म्हणून CM चन्नींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

दरम्यान, भारतीय जनता पक्षाविरोधात लढण्यासाठी काँग्रेस हाच पर्याय असून त्यासाठीच आपण हा प्रवेश केला असल्याचे समजते आहे. "आम्ही या तरुण नेत्यांसोबत काम करण्यास उत्सुक आहोत, कुमार आणि मेवानी, या देशातील सत्ताधारी फॅसिस्ट शक्तींना पराभूत करण्यासाठी लढणार," असे मत काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केले.

loading image
go to top