काँग्रेस पुन्हा मोठा प्रयोग करण्याच्या तयारीत; 'या' नेत्यावर सोपवणार अध्यक्षपदाची जबाबदारी! Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kanhaiya Kumar Delhi Congress president

कन्हैया कुमारच्या नावाचा विचार होत असल्याच्या वृत्तानं काही काँग्रेसजन अस्वस्थ झाले आहेत. कन्हैया कुमार वैचारिक आणि राजकीयदृष्ट्या बाहेरचा आहे, असं पक्षातील काही नेत्यांचं म्हणणं आहे.

Politics : काँग्रेस पुन्हा मोठा प्रयोग करण्याच्या तयारीत; 'या' नेत्यावर सोपवणार अध्यक्षपदाची जबाबदारी!

Kanhaiya Kumar News : पंजाब, यूपी, बिहारसह सर्वच राज्यांमध्ये सातत्यानं पराभवाचा सामना करत असलेली काँग्रेस (Congress) आता मोठा प्रयोग करण्याच्या तयारीत आहे.

या अंतर्गत सीपीआयमधून आलेल्या कन्हैया कुमारला (Kanhaiya Kumar) पक्ष महत्त्वाची भूमिका देऊ शकतो. जेएनयूचा विद्यार्थी नेता असलेल्या कन्हैया कुमारला काँग्रेस दिल्ली प्रदेश काँग्रेसचा (Delhi Pradesh Congress) अध्यक्ष किंवा युवक अध्यक्ष बनवण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय.

सध्या दोन्ही पर्यायांवर चर्चा सुरू असून अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. कन्हैया कुमारला बढती दिल्यास काँग्रेसमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे, त्यामुळं काँग्रेसचा कल डाव्यांच्या विचारसरणीकडं वाढताना दिसत आहे.

काँग्रेसला कन्हैया कुमारच्या माध्यमातून तरुणांना प्रोत्साहन देण्याचा संदेश द्यायचा आहे. कन्हैया कुमार भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल करत आहे. विशेषत: त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या भांडवलशाही धोरणांवर हल्ला चढवला आहे.

अशा परिस्थितीत काँग्रेस कन्हैया कुमारकडं (Congress President) नेता म्हणून पाहत आहे. मात्र, कन्हैया कुमारच्या नावाचा विचार होत असल्याच्या वृत्तानं काही काँग्रेसजन अस्वस्थ झाले आहेत. कन्हैया कुमार वैचारिक आणि राजकीयदृष्ट्या बाहेरचा आहे, असं पक्षातील काही नेत्यांचं म्हणणं आहे.

बिहार काँग्रेसमध्ये कन्हैया कुमारला विरोध

कन्हैया कुमारनं 2021 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याआधी तो भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता होता. बिहारमध्येही कन्हैया कुमारला कोणतीही प्रमुख भूमिका देण्यास विरोध होत आहे. प्रदेश काँग्रेसचे नेते कन्हैया कुमारला मोठी भूमिका देण्याच्या विरोधात आहेत.

कन्हैयाच्या माध्यमातून तरुणांना जोडण्याचा प्रयत्न

शीला दीक्षित या मूळच्या यूपीच्या रहिवासी होत्या, पण त्यांना दिल्लीच्या राजकारणात आणून काँग्रेसला मोठं यश मिळालं. याचं कारण दिल्लीत बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. काँग्रेस या लोकांना कन्हैया कुमारच्या माध्यमातून जोडू शकतं. याशिवाय, युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. अशा स्थितीत त्यांच्या जागी कन्हैया कुमारला आणण्याचा विचार सुरू आहे, जो तरुण वर्गाला काँग्रेससोबत आणू शकेल.