कन्हैयाचा मुलगा म्हणाला, व्हॉट्सॲप मेसेजची बाबांना नव्हती माहिती

Kanhaiyas son said that the father was not aware of the WhatsApp message
Kanhaiyas son said that the father was not aware of the WhatsApp messageKanhaiyas son said that the father was not aware of the WhatsApp message

उदयपूर : कन्हैयालालच्या आठ वर्षांच्या मुलाने अनवधानाने ही पोस्ट काही व्हॉट्सॲप ग्रुपवर (WhatsApp message) टाकली होती. काही कट्टरवाद्यांनी ही पोस्ट पाहिल्यावर कन्हैयालालचे शत्रू झाले. आता कन्हैयालालच्या मुलाने वडिलांना याबाबत काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. वडिलांची हत्या करणाऱ्यांना ठार मारा, अशी मागणी मुलाने प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. वडिलांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, असेही मुलाचे म्हणणे आहे. (Kanhaiyas son said that the father was not aware of the WhatsApp message)

राजस्थानच्या (rajasthan) उदयपूरमध्ये (Udaipur) कन्हैयालालच्या हत्येनंतर शहरात शांतता आहे. उदयपूरमधील टेलरच्या हत्येच्या घटनेला दहशतवादी कृत्य मानून केंद्र सरकारने बुधवारी (ता. २९) राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) तपास हाती घेण्याचे निर्देश दिले. तसेच यात कोणती संघटना किंवा आंतरराष्ट्रीय सहभाग शोधण्याचे निर्देश दिले.

Kanhaiyas son said that the father was not aware of the WhatsApp message
ईशनिंदेला शिरच्छेदाची शिक्षा हे मदरशांचंच शिक्षण : अरिफ मोहम्मद खान

उदयपूरच्या सात पोलिस ठाण्यांतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राजस्थानच्या सर्व ३३ जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दोन जणांनी मंगळवारी उदयपूरमध्ये (Udaipur) कन्हैयालालची धारदार शस्त्रांनी हत्या केली होती. इस्लामच्या अपमानाचा बदला घेत असल्याचे सांगत व्हिडिओ व्हायरल केला होता.

सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. अशा घटना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कट्टरपंथी घटकांच्या सहभागाशिवाय घडू शकत नाही, असे घटनेच्या एक दिवसानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले.

बुधवारी शवविच्छेदनानंतर कन्हैयालालचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कन्हैयालालला दोन मुले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com