कानपूर इमारत कोसळल्याप्रकरणी सप नेत्यावर गुन्हा

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

कानपूर (उत्तर प्रदेश) : बांधकाम सुरू असलेली सहा मजली इमारत कोसळून झालेल्या अपघातप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते मेहताब आलम आणि बांधकाम कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आलम यांच्या गृहनिर्माण प्रकल्पातील बांधकाम सुरू असलेली इमारत गुरूवारी कोसळली. या अपघातात पाच बांधकाम कामगार मृत्युमुखी पडले. तर 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथकाचे मदतकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 18 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आले असून मदतकार्य सुरूच आहे.

'आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तीस पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मदतकार्य सुरूच आहे', अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकातील वरिष्ठ अधिकारी आलोक कुमार सिंह यांनी दिली. दरम्यान, आलम आणि स्थानिक बांधकाम कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Web Title: Kanpur building collapse: FIR lodged against SP leader, contractor