esakal | कपिल देव यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, चेतन शर्माने ट्विट करुन दिली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

kapil dev discharged

भारताचा महान अष्टपैलू खेळाडू कपिल देवला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कपिल देव यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, चेतन शर्माने ट्विट करुन दिली माहिती

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: भारताचा महान अष्टपैलू खेळाडू कपिल देवला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांनी याबद्दलची माहिती ट्विट करून दिली आहे. शुक्रवारी  हृदयविकाराच्या झटक्यानंतर कपिल देव यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. छातीत वेदना सुरु झाल्याने त्यांना दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 

चेतन शर्माने हॉस्पिटलचे डॉक्टर अतुल माथूर यांच्यासोबत कपिलचा फोटो पोस्ट केला आहे. डॉ. माथूर यांनी कपिल देवची अँजिओप्लास्टी केली होती. डिस्चार्जच्या वेळी शर्मा यांनी कपिल देव यांचा एक फोटो ट्विट केला ज्यात त्यांनी कॅप्शन दिले की, "डॉ. अतुल माथूर यांनी कपिल पाजीची अँजिओप्लास्टी  केली होती. सध्या ते ठीक झाले आहेत आणि त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

हेही वाचा- Bihar Election: प्रचाराला निघालेल्या उमेदवाराची हत्या, जमावाच्या मारहाणीत हल्लेखोराचाही मृत्यू

 याआधी चेतन शर्माने हॉस्पिटलमधून कपिल आणि त्याच्या मुलीचा फोटो ट्विट केला होता. त्यात चेतन शर्मा म्हणाला की होता, कपिलची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून ते आता उत्तम आहेत. त्या फोटोत कपिल देव दोन्ही हातांनी थंब केला होता.

कपिलच्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि इतर अनेक क्रिकेटपटूंनी प्रार्थना केली होती. 1983 मध्ये पहिला क्रिकेट विश्वचषक असलेला कर्णधार कपिल हा कसोटी क्रिकेटमधील भारताचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.