वेगळा गट स्थापण्याची मिश्रा यांना संधी देणार

पीटीआय
सोमवार, 29 मे 2017

मिश्रा हे एके काळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सर्वांत विश्‍वासातील होते. मात्र त्यांनी मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे दिल्लीचे राजकारण ढवळून निघत आहे.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या नेतृत्वावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने मंत्रिमंडळातून हकालपट्टी केलेले मंत्री कपिल मिश्रा यांना पक्षातून निलंबित केले आहे. मात्र दिल्ली विधानसभेत कपिल मिश्रा यांना अन्य पक्षात सहभागी होण्यासाठी किंवा स्वत:चा गट स्थापन करण्याची संधी देण्यात येईल, असे आम आदमी पक्षाच्या सूत्रांनी दिली. वास्तविक विधानसभेत बहुमत असतानाही आप हे टाळण्याचा प्रयत्न करीत आहे.

वास्तविक मिश्रा हे एके काळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सर्वांत विश्‍वासातील होते. मात्र त्यांनी मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे दिल्लीचे राजकारण ढवळून निघत आहे. त्याचप्रमाणे पक्षाच्या प्रतिमेला तडे गेले आहेत.

मिश्रा यांनी केलेले सर्व आरोप "आप'ने फेटाळून लावले आहेत आणि त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. पक्षाने आत्तापर्यंत मिश्रा, देविंदर सेहरावत, अमानतुल्ला खान, माजी मंत्री असिम अहमद खान आणि संदीपकुमार या पाच आमदारांना निलंबित केले आहे.

Web Title: kapil mishra aam aadamy party faction