
Kapil Sibbal: ‘संसदेत धार्मिक विधी न होणारा भारत हवा’, कपिल सिब्बल यांचा भाजपवर हल्लाबोल
संसदेच्या उद्घाटनावरून खासदार कपिल सिब्बल यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘‘मला माझा भारत नवा किंवा जुना नको, पण येथे धार्मिक विधी न होता, कायद्याने सर्वांना समान वागविले जाईल व धार्मिक श्रद्धेसाठी कोणाचाही बळी जाणार नाही, असा भारत हवा,’’ असे ते म्हणाले. (Latest Marathi News)
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी नव्या संसद इमारतीचे उद्घाटन केले. त्यावेळी हे उद्घाटन म्हणजे विकासाच्या प्रवासातील ऐतिहासिक क्षण आहे, असे वर्णन केले. नवीन इमारत ही ‘नव्या भारता’च्या आकांक्षा व संकल्पांचे प्रतिबिंब असून अधिक मोठी ध्येय ठरवून त्याच्या पूर्णत्वासाठी काम करण्यासाठीचे ऊर्जास्रोत आहे, असे म्हटले होते.(Latest Marathi News)
यावर सिब्बल यांनी ट्विट करीत सरकार आणि भाजप म्हणतो: नवीन भारतासाठी नवीन संसद. मी म्हणतो: मला माझा भारत नवीन किंवा जुना नको आहे. जेथे १) धार्मिक विधीशिवाय संसद आहे. २) कायद्याने सर्व समान आहेत. ३) धार्मिक श्रद्धेसाठी नागरिकांचा बळी जाणार नाही, ४) तरुणांनी प्रेमविवाह केल्यास; बजरंग दलाची भीती नाही, ५) संघटित राजकारण नाही, ६) माध्यमे निपक्ष आहेत, असा भारत मला हवा आहे.(Latest Marathi News)