मीच खरा हिंदू, मात्र काही बनावट- सिब्बल

वृत्तसंस्था
शनिवार, 8 डिसेंबर 2018

देशात मीच खरा हिंदू आहे, बाकी काहीजण हिंदू असल्याचा बनाव करत आहेत. देशाला असा बदल नकोय, की जो आपल्या दुर्दशेचे कारण बनेल, असा बदलाव नकोय जो आपल्याच संविधानाच्या चिंधड्या करेल, असे परखड मत काँग्रेसचे नेते कपिल सब्बल यांनी मांडले आहे.

नवी दिल्ली : देशात मीच खरा हिंदू आहे, बाकी काहीजण हिंदू असल्याचा बनाव करत आहेत. देशाला असा बदल नकोय, की जो आपल्या दुर्दशेचे कारण बनेल, असा बदलाव नकोय जो आपल्याच संविधानाच्या चिंधड्या करेल, असे परखड मत काँग्रेसचे नेते कपिल सब्बल यांनी मांडले आहे.

जागरण फोरमच्या कार्यक्रमात शनिवारी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रिय मंत्री कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारवर टीका केली. सिब्बल यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका करताना त्यांनी नोटाबंदीवरूनही लक्ष्य केले. तसेच, पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींनी 15 लाख देण्याच्या केलेल्या वक्तव्यावरही टीका केली. काळा पैसा, विकास आणि देशाला पुढे घेऊन जायचे स्वप्न मोदींनी दाखवले. परंतू त्यांना समजायला हवे की, भाषण देण्यात आणि शासन चालवण्यात खूप मोठा फरक असतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

तुम्ही देशात 3000 कोटी रुपयांचा पुतळा उभारून देशातील गरीबी दूर नाही करू शकत हे लक्षात घ्यायला हवे. दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा गरज नसताना बाऊ करण्यात आल्याचे, मत निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुड्डा यांनी व्यक्त केल्यावर याचा दाखला देत सर्जिकल स्ट्राईकला राजकीय मुद्दा बनवणे चुकीचे असल्याचे मतही सिब्बल यांनी यावेळी व्यक्त केले.

Web Title: kapil sibbal criticized modi govt policies in jagran forum