पंतप्रधान मोदींनी कारगिल युद्धातील हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली

टीम ई सकाळ
बुधवार, 26 जुलै 2017

देशाच्या अस्मितेसाठी आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कारगिल युद्धात प्राणपणाने लढलेल्या शूर जवानांची आठवण येते.

नवी दिल्ली : कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय लष्कराच्या फौजांचे सामर्थ्य आणि देशासाठीचा त्याग यांचे स्मरण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. 

कारगिल येथे पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात 26 जुलै 1999 रोजी भारताने विजय मिळविला होता. हा विजय दिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे की, "देशाच्या अस्मितेसाठी आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कारगिल युद्धात प्राणपणाने लढलेल्या शूर जवानांची आठवण येते. देशाच्या लष्करी सामर्थ्याची आठवण करून देणारा हा दिवस आहे. देशाला अत्यंत सुरक्षित ठेवणाऱ्या लष्करी फौजांच्या महान त्यागाची आठवण हा दिवस करून देतो."

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: kargil vijay diwas 2017 indian army martyrs PM modi pays tribute