Halal meat
Halal meat Sakal

Karnataka: हिजाबनंतर आता 'हलाल मटण' वाद

मटणविक्रेत्याला मारहाण, बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांना अटक, होसमाने पोलिस स्टेशनला FIR दाखल

'हिजाब' वादानंतर आता कर्नाटकमध्ये 'हलाल' मटणावरुन वाद सुरु आहे. या प्रकरणात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय. कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यात ही घटना घडली होती. बंजरंग दलाचे कार्यकर्ते मटणाच्या दुकानात जाऊन 'हलाल' न केलेल्या मटणासंबंधी विचारणा करत होते. एका मटणविक्रेत्याने असं मटण उपलब्ध नसल्याचं सांगताच त्याला या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. तसेच ह्याच कार्यकर्त्यांनी एका हॉटेलमध्ये हलाल नसलेल्या मटणाच्या डिशची मागणी केली होती. मात्र असं मटण उपलब्ध नसल्याचं सांगताच तेथेही गोंधळ घातला. 'हलाल मटण' हे समाजाच्या एका वर्गासाठी (मुस्लीमांसाठी)च असतं, हिंदुंनी खायची गरज नाही, असं वक्तव्य शेतकरी कल्याण केंद्रिय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी केलंय. (Halal meat )

Halal meat
'भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होईल', PM मोदींच्या बैठकीत अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त

हलाल मटणाचा विरोधासंबंधी बोलताना, 'हलाल मीट' वर विरोध आता सुरु झालाय, यासंदर्भात आम्ही लक्ष घालू अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी दिली होती. तर 'हलाल मटण' हे समाजाच्या एका वर्गासाठी (मुस्लीमांसाठी)च असतं, हिंदुंनी खायची गरज नाही, असं वक्तव्य शेतकरी कल्याण केंद्रिय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी केलंय. तर कर्नाटकचे ग्रामीण विकासमंत्री के एस् ईश्वरप्पा म्हणाले, मुस्लिम हलाल मटण खात असतील तर त्याला आमचा आक्षेप नाही, पण इतरांवर ते थोपले जाऊ नये.

1 एप्रिलला कर्नाटकच्या भद्रावती येथे सात जणांना हलाल मटण प्रकरणात अटक करण्यात आलंय. शिवमोगा जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक बी एम् लक्ष्मीप्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्लिम विक्रेत्याला मारहाण प्रकरणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असुन,होसमाने पोलिस स्टेशनला FIR दाखल करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com