कर्नाटकात अपघात; 8 ठार, 5 जखमी

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

गुलबर्गा -

कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्याजवळ झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार तर 5 जण जखमी झाले आहेत.
गुलबर्गा जिल्ह्याजवळ आळंद गावाजवळ हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार उस्मानाबादमधील रहिवासी गुरुपौर्णिमेनिमित्त गाणगापूरच्या दिशेने क्रूझर मोटारीतून देवदर्शनासाठी निघाले होते. आळंदजवळ एका मोठ्या ट्रकने जोरदार क्रूझरला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये 8 जण जागीच ठार झाले. तर 5 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी गुलबर्ग्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Karnataka accident; 8 killed, 5 injured

टॅग्स