कर्नाटकमध्ये मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये प्रमुख लढत 

वृत्तसंस्था
शनिवार, 12 मे 2018

राजराजेश्‍वरीची निवडणूक रद्द
बनावट मतदार ओळखपत्रे सापडल्यामुळे निवडणूक आयोगाने वादात सापडलेल्या राजराजेश्‍वरी मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्याचा आदेश दिला. आता या मतदारसंघात 28 मे रोजी मतदान होईल आणि मतमोजणी 31 मे रोजी होईल.

बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांपैकी 222 जागांसाठी आज (शनिवारी) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांमध्येच याठिकाणी लढाई आहे.  

राज्यभरात 2 हजार 655 उमेदवार रिंगणात असून, या सर्वांचे भवितव्य मतयंत्रात बंद होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील 18 जागांसाठी 203 उमेदवार रिंगणात असून, सीमाभागातील बेळगाव शहर, तालुका व खानापूर तालुक्‍यातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी असून, निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच एक तास वाढवून दिला आहे. 

निवडणूक आयोगाने 27 मार्च रोजी आचारसंहिता जाहीर केली, तेव्हापासून गेला दीड महिना निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 

४.९६ कोटी.... मतदार 
२.५२ कोटी..... पुरुष मतदार 
२.४४ कोटी..... महिला मतदार 
४ हजार ५५२... तृतीयपंथी उमेदवार 
२ हजार ६००..... रिंगणातील उमेदवार 
५५ हजार ६००....... मतदान केंद्रे 
३.५ लाख.... तैनात कर्मचारी 

राजराजेश्‍वरीची निवडणूक रद्द
बनावट मतदार ओळखपत्रे सापडल्यामुळे निवडणूक आयोगाने वादात सापडलेल्या राजराजेश्‍वरी मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्याचा आदेश दिला. आता या मतदारसंघात 28 मे रोजी मतदान होईल आणि मतमोजणी 31 मे रोजी होईल.

Web Title: Karnataka Assembly election 2018 Voting begins in 222 constituencies