Karnataka Election : कर्नाटकात राजकारण पेटलं; अमित शाह म्हणाले, काँग्रेसच्या काळात बॉम्बस्फोट अन्...

Amit Shah
Amit Shah esakal

Amit Shah News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. कर्नाटकच्या दावणगिरी येथून त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

काल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून 'विषारी साप' असा शब्दप्रयोग केला होता. त्यानंतर त्यांनी खुलासादेखील केला. परंतु देशभरात खर्गे आणि काँग्रेसवर टीकेची झोड उठली.

Amit Shah
Wrestler Protest : अखेर बृजभूषण सिंह यांच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल!

दरम्यान, आज दावणगीरीमध्ये अमित शाह यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. केवळ खर्गेच नाही तर गांधी कुटुंबाकडून सातत्याने मोदींचा अपमान केला जातो, असं शाह म्हणाले.

पुढे बोलतांना अमित शाह म्हणाले की, काँग्रसच्या काळात पीएफआयचे कार्यकर्ते मोकाट होते, त्यामुळे बॉम्बस्फोट आणि हत्येच्या घटना घडल्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएफआयवर बंदी घालून ९५ जणांना तुरुंगात पाठवले.

Amit Shah
Arjun Tendulkar Original Video : अर्जून तेंडुलकरचा 'तो' व्हीडिओ बनावट; 'फॅक्ट चेक'मधून झालं स्पष्ट

'काँग्रेसने त्यांच्या राजवटीत गरीबांची कधीच चिंता केली नाही. त्यांनी विकास केला नाही की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत. इथल्या काँग्रेसने फक्त दिल्लीला पैसे पाठवण्याचं काम केलं.' असा घणाघात अमित शाह यांनी केला.

पुढे बोलतांना अमित शाह म्हणाले की, काँग्रेसने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं होतं. परंतु कर्नाटकमधल्या डबल इंजिनच्या सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव दिला, खतं-पाणी पुरवलं. भाजपने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकल्याचही शाहांनी नमूद केलं.

कर्नाटक निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. एकीकडे काँग्रेस तर दुसरीकडे भाजपने रान पेटवायला सुरुवात केली आहे. कर्नाटकमध्ये सत्ताधारी पक्षाला फटका बसतो, असा प्रघात आहे. त्यामुळे यावेळी कर्नाटकची जनता कोणाला साथ देणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com