Karnataka Assembly Election
Karnataka Assembly Electionesakal

Karnataka Assembly Election : 'होय! मी आहे विषारी साप' पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाने चर्चा

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काँग्रेसने केलेल्या आरोपांना भाजपकडून जशास-तसं प्रत्युत्तर मिळत आहे.

तीन दिवसांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी नरेंद्र मोदींचा उल्लेख 'विषारी साप' असा केला होता. त्यांच्या विधानाने देशभरात काँग्रेसविरोधात टीकेची झोड उठवली गेली.

Karnataka Assembly Election
पुण्यात A. R. Rehman च्या शोपूर्वी पोलिसांची मोठी कारवाई, सव्वा दोन कोटींचे ड्रग्स जप्त!

या टीकेनंतर मल्लिकार्जून खर्गे यांनी सारवासरव करीत भाजप विचारसरणी विषारी सापासारखी असल्याचं म्हटलं होतं, तरीही भाजपने संधीचा फायदा घेत काँग्रेस आणि खर्गेंवर आसूड ओढले.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातून खर्गेंच्या टीकेला जशास-तसं प्रत्युत्तर दिलं आहे. मोदी म्हणाले की, मी भ्रष्टाचाराविरोधात लढा उभा केल्याने काँग्रेसला त्रास होत आहे.

Karnataka Assembly Election
राऊत-अंधारे यांच्या टीकेला उत्तर देण्यास आम्ही रिकामटेकडे नाही; उदय सामंत यांचा टोला

मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेसवाले माझी तुलना सापाशी करीत आहेत आणि मतं मागत आहेत. परंतु हा साप भगवान शंकराच्या गळ्यातला आहे. तो शोभनीय असून माझ्यासाठी देशातील जनता देवाचं शंकराचं स्वरुप आहे. त्यामुळे मला हा साप बनणं आवडेल, असं मोदी म्हणाले.

'काँग्रेसवाले मला धमकी देत आहेत. मोदी तुझी कबर खोदली जाईल, असं म्हणत आहेत. आता तर काँग्रेसने सर्वात मोठा मुद्दा सापाचा केला आहे' मोदींनी हे सांगून येत्या १० मे रोजी मतपेटीतून जनता त्यांना उत्तर देईल, हा विश्वास व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com