Karnataka Election 2023: ज्या राज्यातील भाषणामुळे खासदारकी गेली, तिथेच राहुल गांधींचा भाजपला हादरा | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka Election 2023: ज्या राज्यातील भाषणामुळे खासदारकी गेली, तिथेच राहुल गांधींचा भाजपला हादरा

Karnataka Election 2023: ज्या राज्यातील भाषणामुळे खासदारकी गेली, तिथेच राहुल गांधींचा भाजपला हादरा

नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेसचं पूर्ण बहुमताचं सरकार स्थापण होणार आहे. देशात बऱ्याच काळानंतर मिळालेल्या या दणकेबाज विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झालं आहे. कर्नाटक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र भाजपला विजय मिळवून देण्यात मोदींचा करिष्मा देखील कमी पडला. मात्र आता भाजपच्या पराभवाची विविध कारणे समोर येत आहे. (Karnataka Assembly Election 2023 Rahul Gandhi congress wins)

कर्नाटक राज्यातील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केलेल्या भाषणातील विधानामुळे राहुल गांधी यांनी आपली खासदारकी गमवावी लागली आहे. तसेच ६ वर्षांच्या निलंबनाला सामोरं जावं लागलं. मात्र राहुल यांनी त्याच राज्यात काँग्रेसला सत्ता मिळवून दिली. या विजयात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शिवाय काँग्रेसचे अध्यक्ष देखील कर्नटकमधीलच आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, कोलारमध्येच राहुल यांनी 'मोदी' आडनावासंदर्भात एक वादग्रस्त विधान केले होते, ज्यासाठी त्यांना मानहानीप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर राहुल यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मात्र राहुल गांधी यांनी त्याच ताकदीने मैदानात उतरून भाजपशी दोन हात केले.

निवडणुकीपूर्वीच राहुल यांनी कर्नाटकात काँग्रेस १५० च्या जवळपास जागा जिंकेल असा दावा केला होता. त्यानुसार काँग्रेस आतापर्यंत १३६ जागांवर आघाडीवर आहेत.