Rahul Gandhi Video : 'डिलिव्हरी बॉय'च्या स्कूटरवर बसून राहुल गांधींनी लक्ष वेधलं; कर्नाटकात वातावरण तापलं

Rahul Gandhi Video : 'डिलिव्हरी बॉय'च्या स्कूटरवर बसून राहुल गांधींनी लक्ष वेधलं; कर्नाटकात वातावरण तापलं

बंगळूरुः कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आरोप-प्रत्यारोप आणि कुरघोड्यांच्या राजकारणाने वातावरण पेटलेलं असतांना राहुल गांधी यांनी आज सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

येत्या १० तारखेला कर्नाटकमध्ये निवडणूक होत आहे. आज रविवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सात तब्बल रॅली कव्हर केल्या. दरम्यान, राहुल गांधींच्या एका कृतीने देशाच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या.

Rahul Gandhi Video : 'डिलिव्हरी बॉय'च्या स्कूटरवर बसून राहुल गांधींनी लक्ष वेधलं; कर्नाटकात वातावरण तापलं
Manipur Violence : मणिपूरमध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांसाठी पवार-शिंदे सरसावले! फोनवरून…

बंगळूरु येथे राहुल गांधी यांनी एका डिलिव्हरी बॉयसोबत प्रवास केला. त्यांनी डिलिव्हरी बॉयच्या स्कूटरवर पाठीमागे बसून तब्बल दोन किलोमीटर प्रवास केला. याचा व्हीडिओ देशभर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बंगळूरुमध्ये मेगा रोड शो केला. त्यांच्या रोड शोला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. रस्त्याच्या दुतर्फा लोक जमले होते.

१० मे रोजी एका टप्प्यात कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपला कर्नाटकात फटका बसेल. तिथे भाजपला फारसं समर्थन उरलं नसल्याचं सांगितलं जात आहे.

Rahul Gandhi Video : 'डिलिव्हरी बॉय'च्या स्कूटरवर बसून राहुल गांधींनी लक्ष वेधलं; कर्नाटकात वातावरण तापलं
Joe Root IPL Debut : 18000 धावा करणाऱ्या इंग्लिश फलंदाजाला अखेर राजस्थानने उतरवले मैदानात

त्यामुळे पंतप्रधानांपासून ते इतर राज्यातल्या भाजपच्या नेत्यांपर्यंत, सगळेच कर्नाटकात व्यस्त आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही बेळगावच्या दक्षिण भागात रोड शो केला. १३ तारखेला मतमोजणी होणार आहे. तेव्हाच कुणाला किती यश मिळालं, हे कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com