कुमारस्वामींना लागणार मुख्यमंत्रीपदाची लॉटरी?

मंगळवार, 15 मे 2018

बंगळूर: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष ठरला असला, तरी काँग्रेस आणि जेडीएस (सेक्युलर) एकत्र येत सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येते आहे. हे दोन पक्ष एकत्र आल्यास कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरतील. एच. डी. कुमारस्वामी हे जनता दलचे (सेक्युलर) सर्वेसर्वा आणि भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे सुपुत्र आहेत.

बंगळूर: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष ठरला असला, तरी काँग्रेस आणि जेडीएस (सेक्युलर) एकत्र येत सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येते आहे. हे दोन पक्ष एकत्र आल्यास कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरतील. एच. डी. कुमारस्वामी हे जनता दलचे (सेक्युलर) सर्वेसर्वा आणि भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे सुपुत्र आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणूकीत 222 जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकेल? बहुमताचा 112 हा आकडा कोण गाठेल? कर्नाटक विधानसभेची सत्ता कोण काबिज करतं हे आज स्पष्ट होईलच. परंतु, काँग्रेस आणि जेडीयू हे दोन पक्ष एकत्र आल्यास मुख्यमंत्रीपदाची माळ कुमारस्वामींच्या गळ्याच पडण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसने सरकार स्थापनेसाठी विनाअट जेडीयूला पाठिंबा जाहिर केला आहे. यामुळे सध्यातरी मुख्यमंत्रीपदासाठी कुमारस्वामी हे दावेदार आहेत.

हरदानहल्ली देवेगौडा कुमारस्वामी असे 58 वर्षीय कुमारस्वामींचे संपूर्ण नाव. कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांना 'कुमारअण्णा' म्हणून ओळखले जाते. कुमारस्वामी यांना राजकारणाचे धडे घरातूनच मिळाले आहेत. जनता दल (सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या कुमारस्वामी यांनी 3 फेब्रुवारी 2006 ते 9 ऑक्टोबर 2007 या कालावधीत कर्नाटकच्या 18व्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. 1996 मध्ये रामनगरा जिल्ह्यातील कनकापुरा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून विजयी होत, कुमारस्वामी यांनी राजकारणात प्रवेश केला. मात्र 1998 साली याच मतदारसंघात पुन्हा निवडणुका झाल्या आणि त्यावेळी त्यांचा अत्यंत दारुण पराभव झाला होता. पराभव एवढा मोठा होता की त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. 1999 मध्ये सथनौर मतदारसंघातून कुमारस्वामींनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवली. मात्र त्यावेळीही ते पराभूत झाले.

2004 साली ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यावेळी कुणालाही बहुमत मिळाले नाही. त्यामुळे जेडीएसने काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळी काँग्रेसच्या धरम सिंह यांना मुख्यमंत्री करण्यात आले. पुढे कुमारस्वामी आपले समर्थक आमदार घेऊन सत्तेतून बाहेर पडले. त्यानंतर कुमारस्वामींनी भाजपला सोबत घेत सत्ता स्थापन केली आणि स्वत: मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र, भाजपसोबतची सत्ताही फार काळ टिकली नाही आणि त्या सरकारमधूनही ते बाहेर पडले. खासदार, आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते या संसदीय पदांसोबत त्यांनी जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुराही सांभाळली आहे. ते जनता दल (सेक्युलर) पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत.

दरम्यान, केंद्रामध्ये 1996 मध्ये काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय देवेगौडा यांनी घेतला होता. विशेष म्हणजे याचवेळी देशाचे 11वे पंतप्रधानपदान झाले. एच. डी. देवेगौडा हे जून 1996 ते एप्रिल 1997 या 10 महिन्यांच्या कालावधीमध्ये पंतप्रधानपदावर राहिले होते. देवेगौडा 1994 ते 1996 दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील होते. देवेगौडा यांना पंतप्रधानपदाची लॉटरी लागली होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्रीपदाची लॉटरी कुमारस्वामींना लागणार का? याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Web Title: karnataka assembly election kumaraswamy cm lottery