राहुल गांधींच्या रिपोर्टकार्डमध्ये मोदी 'फेल'

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 मे 2018

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांवर टीका केली जात आहे. कर्नाटकातील विकासाचे 'रिपोर्टकार्ड' काँग्रेसकडून जारी करण्यात आले आहे. त्यानुसार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. राहुल गांधींनी कर्नाटकातील शेतीक्षेत्रासाठी 'एफ' ग्रेड दिली आहे.

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांवर टीका केली जात आहे. कर्नाटकातील विकासाचे 'रिपोर्टकार्ड' काँग्रेसकडून जारी करण्यात आले आहे. त्यानुसार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. राहुल गांधींनी कर्नाटकातील शेतीक्षेत्रासाठी 'एफ' ग्रेड दिली आहे.

Modi

केंद्राकडून कर्नाटक राज्याला कोणताही भरघोस निधी दिला गेला नाही. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या दृष्टीने पावलेही उचलण्यात आली नाही. तसेच पंतप्रधान मोदींच्या पीकविमा योजनेंतर्गत विमा कंपन्यांनी भरघोस फायदा मिळवला. कर्नाटक सरकारचे किमान आधारभूत किंमत (एमएसपी) आणि 50 टक्के शेतकरी कर्नाटकमध्ये आहेत. त्यानंतर काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींच्या कार्याचे रिपोर्टकार्ड जारी करण्यात आले. त्यानुसार काँग्रेसने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 8500 कोटींचा निधी दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या शेतीक्षेत्रासाठी 'एफ' ग्रेड दिला गेल्याचेही ते म्हणाले. 

दरम्यान, कर्नाटकात 12 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपसह काँग्रेसकडून जोरदार प्रचारसभा घेतल्या जात आहेत. 

सिद्धरामय्यांनी आरोप फेटाळले

पंतप्रधान पीकविमा योजनेस कर्नाटकातील काँग्रेस सरकारने कोणतेच सहकार्य केले नसल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यांचा हा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फेटाळून लावला. आपल्या सरकारने या योजनेत 50 टक्के रक्कम भरली असल्याचे त्यांनी ट्‌विटरवरून स्पष्ट केले. पंतप्रधानांचा आरोप खोटा असल्याचे सांगून या योजनेचा 50 टक्के खर्च राज्य सरकारने भरला असल्याचे ते म्हणाले. 

Siddaramaiah

संपूर्ण देशात विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणारे कर्नाटक हे देशातील एकमेव राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. पीकविमा योजना ही यूपीए सरकारने जारी केलेली आहे, तुमच्या सरकारने नाही, अशा कानपिचक्‍याही सिद्धरामय्या यांनी दिल्या.

Web Title: Karnataka assembly elections 2018 Rahul Gandhi gives Modi F for agriculture in Karnataka