Karnataka Assembly Elections : दिल्ली, पंजाब आता कर्नाटक! अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा!

Karnataka Assembly Elections
Karnataka Assembly Elections

कर्नाटक विघानसभा निवडणुकांच्या तारखा जाहिर झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. दिल्ली, पंजाबनंतर केजरीवाल आता कर्नाटक काबीज करण्याचा प्रयत्न करणार आहेत. १० मे ला कर्नाटकमध्ये मतदान होणार आहे. तर १३ तारखेला निकाल लागणार आहे.

अरविंद केजरीवाल यांनी कर्नाटकमध्ये सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आप भाजपला टक्कर देणार का? हे पाहावे लागणार आहे.

आम आदमी पक्ष कर्नाटकमध्ये निवडणूक लढवण्याची आधीपासून तयारी करत आहे. केजरीवाल यांना संघटना देखील निर्माण केल्या आहेत. कर्नाटकमध्ये त्यानी रॅली देखील काढली आहे. आप निवडणूकीत भाजप आणि काँग्रेसला टक्कर देण्याच्या तयारीत आहे.

Karnataka Assembly Elections
MP Girish Bapat Death: बापटांना दिल्लीला जायचं होतं पण फडणवीस म्हणायचे कसब्यातच थांबा..

केजरीवाल यांनी सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. म्हणजेच निवडणुकीच्या मैदानात आता चार मोठे पक्ष एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत. भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध जेडीएस विरुद्ध आम आदमी पार्टी अशी लढत पाहायला मिळणार आहे.

आप सध्या निवडणुकीच्या मोसमात आघाडीवर आहे. पक्षाने ८० जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. आतापर्यंत कोणत्याही पक्षाने उमेदवार जाहीर केले नसून केवळ चर्चा सुरू आहे.

मात्र आम आदमी पक्षाने ८० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. दिल्ली मॉडेलच्या आधारे कर्नाटकातील लोकांची मने जिंकण्याचे काम करणार असल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे.

Karnataka Assembly Elections
Hate Speech Case: भडकाऊ भाषणं रोखण्यात शिंदे सरकार अपयशी! सुप्रीम कोर्टानं दिले 'हे' आदेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com