येडियुरप्पांनी केला मंत्रिमंडळ विस्तार; 17 मंत्र्यांचा समावेश

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

कर्नाटकातील कुमारस्वामींचे काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यात भाजपाला यश आल्यानंतर येडीयुराप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी त्यांना महिना लागला. आज येडीयुराप्पांच्या 17 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

बंगळूर : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर येडियुरप्पा यांनी प्रथमच मंत्रिमंडळाचा विस्तार केला असून, 17 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

कर्नाटकातील कुमारस्वामींचे काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यात भाजपाला यश आल्यानंतर येडीयुराप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी त्यांना महिना लागला. आज येडीयुराप्पांच्या 17 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. येडियुरप्पा यांनी 26 जुलैला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, तर 29 ऑगस्टला विधानसभेत बहुमत सिद्ध केले होते. 

आज सकाळी राजभवनात झालेल्या शपथग्रहण समारंभात राज्यपाल वजूभाई वाला यांनी मंत्र्यांना शपथ दिली. मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी येडियुरप्पा यांनी रविवारी अमित शहा यांची भेट घेतली होती. आज मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या मंत्र्यांमध्ये गोविंद करजोल, अश्वथ नारायण सी. एन., लक्ष्मण सावदी, के. एस. ईश्वरप्पा, आर. अशोक, जगदीश शेट्टार, बी. श्रीरामुलु, एस. सुरेश कुमार, वी. सोमन्ना, सी. टी. रवि, बसवराज बोम्मई, कोटा श्रीनिवास पुजारी, जे. सी. मधु सीमी, सी. सी. पाटील, एच. नागेश, प्रभु चौहान आणि शशिकला जोले अण्णासाहेब यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka CM BS Yediyurappa finally has a cabinet 17 ministers join