सिद्धरामय्या पुन्हा वादाच्या भोवऱ्यात 

पीटीआय
सोमवार, 26 डिसेंबर 2016

म्हैसूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बुटाच्या नाड्या एक व्यक्ती बांधत असल्याची चित्रफीत सर्वत्र पसरल्याने राजकीय गदारोळ उडाला आहे. भाजपने यावर मुख्यमंत्री उद्धट आणि ढोंगी, धर्मनिरपेक्ष असल्याची टीका केली आहे. 

म्हैसूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बुटाच्या नाड्या एक व्यक्ती बांधत असल्याची चित्रफीत सर्वत्र पसरल्याने राजकीय गदारोळ उडाला आहे. भाजपने यावर मुख्यमंत्री उद्धट आणि ढोंगी, धर्मनिरपेक्ष असल्याची टीका केली आहे. 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या दुसरीकडे पाहत असताना त्यांच्या बुटाच्या नाड्या दुसरा एक व्यक्ती बांधत असल्याची चित्रफीत आज पसरली. काही माध्यमांनी हा व्यक्ती मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहायक असून, तो मुख्यमंत्र्यांच्या म्हैसूरमधील निवासस्थानात राहत असल्याचे वृत्त दिले होते; मात्र मुख्यमंत्र्यांच्या माध्यम सल्लागारांनी हा व्यक्ती मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक असल्याचा खुलासा केला आहे. भाजपने या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री हे उद्धट आणि ढोंगी, धर्मनिरपेक्ष असून, सहायकाकडून बुटाच्या नाड्या बांधून घेणे लज्जास्पद आहे, अशी टीका भाजपने केली आहे. 

वादाची किनार कायम 
याआधी मार्च महिन्यात सिद्धरामय्या यांना भेट मिळालेल्या 70 लाख रुपयांच्या घड्याळामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर त्यांनी ते घड्याळ विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करून ते राज्याची मालमत्ता असल्याचे जाहीर केले होते. हे घड्याळ दुबईस्थित अनिवासी भारतीय मित्राने व्यक्तिगत भेट म्हणून दिल्याचे त्यांनी म्हटले होते.

Web Title: Karnataka CM Siddaramaiah caught on camera getting shoelaces tied