siddaramaiah
siddaramaiah

Siddaramaiah : दहशतवादी हल्ल्यात आमचे नेते गेले, भाजपचा एकही नेता…; सिद्धरामय्यांच्या वक्तव्याने खळबळ

काँग्रेसचे दिवंगत नेते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी आहे. या निमीत्त आयोजित कार्यक्रमात कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. लोकांना संबोधित करताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. यावेळा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारची चांगलीच खिल्ली उडवली.

सिद्धरामय्या म्हणाले की, पंतप्रधान मोदी फक्त दहशतवादावर बोलतात, मात्र आजपर्यंत भाजपचा एकही नेता दहशतवादी हल्ल्यात मारला गेला नाही. आम्ही दहशतवादाला प्रोत्साहन देतो, असे भाजप म्हणतो, पण आमचे काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे दोघेही दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरले होते.

बंगळुरू पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना डीके शिवकुमार यांनी देखील राज्यात सरकार स्थापनेनंतर आपली प्रतिक्रिया दिली . राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 135 पेक्षा जास्त जागा जिंकल्या असूनही शिवकुमार कामगिरीवर खूश नाहीत.

ते म्हणाले की विधानसभा निवडणुकीत आम्ही 135 पेक्षा जास्त जागा जिंकल्या, पण मी त्यावर खूश नाही. माझ्या किंवा सिद्धरामय्या यांच्या घरी येऊ नका. आमचे पुढचे लक्ष्य लोकसभा निवडणूक आहे आणि त्यासाठी आपण चांगले लढले पाहिजे.

काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणूकीत ऐतिहासीक विजय मिळाला आहे. काँग्रेसने निवडणूकीत बहुमताचा आकडा पार करत राज्यात सरकार स्थापन करण्यात यश मिळवला. पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदी आणि डीके शिवकुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com