एक्झिट पोल म्हणजे दोन दिवसांचे 'एन्टरटेन्मेंट': सिद्धरामय्या

वृत्तसंस्था
रविवार, 13 मे 2018

एक्झिट पोलविषयी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, की काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक्झिट पोलचे निकाल पाहून चिंता करण्याची कारण नाही. हे दोन दिवसांचे मनोरंजन आहे. कर्नाटकमध्ये पुन्हा आमचेच सरकार बनेल. 

बंगळूर : कर्नाटक विधानसभेसाठी झालेल्या मतदानानंतर प्रसिद्ध झालेल्या अंदाजांनुसार (एक्झिट पोल), बहुमत कोणत्याही पक्षाला मिळण्याची शक्‍यता दिसत नाही असे स्पष्ट झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हे अंदाज म्हणजे दोन दिवसांचे मनोरंजन असल्याचे म्हटले आहे.

काही अंदाजांमध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळण्याची शक्‍यता दिसत असल्यामुळे हा पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याची चिन्हेही आहेत. बहुमत कोणालाच मिळाले नाही, तर धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) "किंगमेकर'च्या भूमिकेत येऊ शकतो, असे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. लोकसभेसाठी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यादृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यातही पक्षाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर राहुल यांची ही पहिलीच कसोटी आहे.

एक्झिट पोलविषयी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, की काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक्झिट पोलचे निकाल पाहून चिंता करण्याची कारण नाही. हे दोन दिवसांचे मनोरंजन आहे. कर्नाटकमध्ये पुन्हा आमचेच सरकार बनेल. 
--- 
विविध अंदाज असे : 
--- 
कर्नाटक विधानसभा 
- एकूण जागा : 222 
- बहुमतासाठी : 112 
--- 
इंडिया टुडे-ऍक्‍सिस 
- भाजप : 79-92 
- कॉंग्रेस : 106-118 
- जेडीएस : 22-30 
--- 
न्यूज एक्‍स-सीएनएक्‍स 
- भाजप : 102-110 
- कॉंग्रेस : 72-78 
- जेडीएस : 35-39 
--- 
सुवर्णा न्यूज-24*7 
- भाजप : 79-92 
- कॉंग्रेस : 106-118 
- जेडीएस : 22-30 
--- 
टाइम्स नाऊ-व्हीएमआर 
- भाजप : 80-93 
- कॉंग्रेस : 90-103 
- जेडीएस : 31-39 
--- 
एबीपी न्यूज-सीव्होटर 
- भाजप : 97-109 
- कॉंग्रेस : 87-99 
- जेडीएस : 21-30 
- अन्य : 1-7 
--- 
इंडिया टीव्ही-व्हीएमआर 
- भाजप : 87 
- कॉंग्रेस : 97 
- जेडीएस : 35 
- अन्य : 3 

Web Title: Karnataka CM Siddaramaiah terms exit polls as entertainment