Coronavirus : अडीच हजारांहून अधिक लोकांच्या संपर्कात आला कोरोनाग्रस्त रुग्ण

वृत्तसंस्था
Tuesday, 10 March 2020

एक मार्चला कर्नाटकात 

- 43 प्रकरणं पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. यातील एक रुग्ण तब्बल 2666 लोकांच्या संपर्कात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना कर्नाटकातील बंगळुरु येथे घडली. याबाबत आरोग्य विभागाचे अधिकारी पुढील तपासणी करत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ज्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे, त्याची पत्नी आणि मुलालाही इतर वॉर्डात ठेवण्यात आले आहे. यापूर्वी संशयित एका रुग्णाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.

Coronavirus

याबाबत कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले, की संशयित आढळलेल्या रुग्णाची पत्नी आणि मुलाला इतर रुग्णांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय त्याच्या एका सहप्रवाशालाही वेगळे ठेवण्यात आले. या प्रवाशाशी जवळपास 2666 लोक संपर्कात आले आहेत. मात्र, हा रुग्ण ज्या कोणाच्या संपर्कात आला आहे याची माहिती घेणे सध्या सुरु करण्यात आले आहे. 

एक मार्चला कर्नाटकात

सुधाकर म्हणाले, हे सर्व रुग्ण एक मार्चला अमेरिकेतून मंगळुरु आले होते. त्यानंतर यातील पाच प्रवाशांमध्ये कोरोनाचे लक्षण आढळून आले. त्यानंतर या सर्वांना तात्काळ आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. आता त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

Coronavirus

43 प्रकरणं पॉझिटिव्ह

जगभरात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरत आहे. भारतात आत्तापर्यंत 43 प्रकरणांची नोंद झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka confirms first positive case of coronavirus