हिंदू-मुस्लिम प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या

Karnataka
Karnatakaesakal
Summary

कर्नाटकातील (Karnataka) विजयपुरामध्ये हिंदू-मुस्लिम (Hindu-Muslim) प्रेमातून एक धक्कादायक घटना समोर आलीय.

विजयपुरा (कर्नाटक) : कर्नाटकातील (Karnataka) विजयपुरामध्ये हिंदू-मुस्लिम (Hindu-Muslim) प्रेमातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथे एका मुस्लीम कुटुंबानं आपल्या मुलीशी कथित प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून एका हिंदू तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह गावातील शेतातील विहिरीत फेकून दिलाय.

पोलिसांनी (Police) जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय, की 34 वर्षीय रवी निंबर्गी 21 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता आणि दुसऱ्या दिवशी तरुणाच्या कुटुंबाने तक्रार केली की त्याची हत्या मुस्लीम मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून 3 पथकं रवाना केली आहेत. पथके तयार केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

Karnataka
एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून केला आणि तासभर...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी विजयपुरा जिल्ह्यातील बालगानूर गावातील एका विहिरीतून रवीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मुलीच्या भावाला, तिच्या एका नातेवाईकाला खून, गुन्हेगारी कट आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक केलीय. रवीचे नातेवाईक शशिधर यांनी पत्रकारांना सांगितले, की तरुण आणि तरुणीचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरोपी आणि इतर नातेवाईकांनी या जोडप्याला अनेक वेळा गंभीर परिणामांची धमकी दिली होती, असं त्यांनी नमूद केलं.

Karnataka
जगातील मुस्लिमांसह भारतातील मुसलमान पाकिस्तानी संघासोबत होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com