कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 एप्रिल 2018

आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राज्यात 12 मेला मतदान होणार आहे. या निवडणुकांचे निकाल 15 मेला जाहीर केले जाणार आहेत. विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राज्यात 12 मेला मतदान होणार आहे. या निवडणुकांचे निकाल 15 मेला जाहीर केले जाणार आहेत. विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

Karnataka assembly

राज्यातील विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी काँग्रेससह भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. तसेच प्रचारसभादरम्यान काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते बी. एस. येडीयुरप्पा या दोन्ही नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी लढत होणार आहे.    

निवडणूक कार्यक्रम वेळापत्रक जाहीर करण्यात आला असून, या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 24 एप्रिल आहे. दाखल झालेल्या अर्जांची 25 एप्रिलला छाननी करण्यात येईल. तसेच 27 एप्रिलला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने चोख व्यवस्था केली आहे. राज्यात 4.9 कोटी मतदार असून, या मतदानासाठी 55,696 मतदान केंद्र कार्यरत असणार आहेत.

Web Title: Karnataka Election 2018 Voting dates election results polling schedule release today Election Result will be announces in 15 May