Karnataka Election 2023 : कर्नाटकात ६५ टक्के मतदान, १३ मे रोजी निकाल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka Election 2023

Karnataka Election 2023 : कर्नाटकात ६५ टक्के मतदान, १३ मे रोजी निकाल!

Karnataka Election 2023 : कर्नाटक राज्यातील विधानसभेच्या 224 जागांसाठी आज (बुधवार) मतदान पार पडले. मतदान आज सकाळी 9 वाजता सुरू झाले आणि संध्याकाळी ६ वाजता संपले. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी सीलबंद करण्यात आले आहेत. कर्नाटकात एकूण 65.70 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. 2018 मध्ये राज्यात 72 टक्के मतदान झाले होते.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल 13 मे रोजी लागणार आहे. मतदानाला संथ सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर मतदानात वाढ झाली. निवडणूक आयोगाच्या मते, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान चिकबल्लापूर जिल्ह्यात 76.64 टक्के, तर BBMP (दक्षिण) जिल्ह्यात सर्वात कमी 48.63 टक्के मतदान झाले.

बेंगळुरू ग्रामीणमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 76.10 टक्के मतदान झाले असून, बागलकोट 70.04 टक्के आणि बेंगळुरू अर्बनमध्ये 52.19 टक्के मतदान झाले आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार BBMP (मध्य) आणि BBMP (उत्तर) मध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 50.10 टक्के आणि 50.02 टक्के मतदान झाले.

ब्रुहत बेंगळुरू महानगर पालिका (BBMP) मध्य येथे दुपारी 1 वाजेपर्यंत 29.41 टक्के मतदान झाले, तर BBMP (उत्तर) मध्ये 29.90 टक्के मतदान झाले.

दुपारी 1 वाजेपर्यंत बीबीएमपी (दक्षिण) 30.68 टक्के, बागलकोट 40.87 टक्के, बंगळुरू ग्रामीण 40.16 टक्के, बेंगळुरू अर्बन 31.54 टक्के, बेळगाव 37.48 आणि बेल्लारी 39.74 टक्के मतदान झाले.

दक्षिण कन्नडमध्ये 44.17 टक्के, विजापूरमध्ये 36.55 टक्के, दावणगेरेमध्ये 38.64 टक्के, उत्तरा कन्नडमध्ये 42.43 टक्के आणि तुमकूरमध्ये 40.60 टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

कर्नाटकमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 52.18 टक्के मतदान झाले होते, दुपारी 1 वाजता 37.25 टक्के आणि सकाळी 11 वाजता 20.99 टक्के मतदान झाले. राज्यभरातील 58,545 मतदान केंद्रांवर एकूण 5.31 कोटी मतदार मतदान करण्यास पात्र ठरले. कर्नाटक विधानसभेत 224 जागांसाठी 2,615 उमेदवार रिंगणात आहेत.

टॅग्स :Karnataka